मातोंड येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

101
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१०: ग्रामपंचायत मातोंड व युवा रक्तदाता मित्रमंडळ, मातोंड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सावंतवाडी रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराला प्रमुख अतिथी म्हणून वेंगुर्ला होमिओपॅथी काॅलेजचे डॉ. संजीव लिंगवत उपस्थित होते. त्यांनी रक्तदात्यांना व युवा रक्तदाता मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन करतानाच उपस्थित ग्रामस्थांना रक्तदानाविषयी जनजागृतीचा संदेश दिलाच, शिवाय स्वतः रक्तदान करुन रक्तदात्या युवकांचा उत्साहसुद्धा वाढविला.
यावेळी व्यासपीठावर मातोंड सरपंच सौ. मयुरी वडाचेपाटकर, ग्रामपंचायत सदस्य राहुल प्रभू, दिपेश परब, वैभवी परब, मातोंड सोसायटीचे संचालक ज्ञानेश्वर केळजी, एम .जी. मातोंडकर, रक्तमित्र सिद्धार्थ पराडकर, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी रक्तपेढीच्या रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ. पटेल, अनिल खाडे, प्राजक्ता रेडकर, मानसी बागेवाडी, राहूल जाधव, राजेंद्र गोरा आदी उपस्थित होते.
हे रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी मातोंड सरपंच सौ. वडाचेपाटकर, दूर्मिळ रक्तदाता नितीन तळवडेकर, राहूल प्रभू, महेश वडाचेपाटकर, सचिन कोंडये, प्रसाद नाईक, नवतरुण रक्तदाता साहील परब, साहील नाईक, गिरीश प्रभू, काशी परब, दीपेश परब, वासुदेव परब, देवेश परब, बाबली उर्फ भाऊ गवंडे तसेच युवा रक्तदाता मित्रमंडळाच्या इतरही सर्व कार्यकर्त्यांनी आणि ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.
रक्तदात्यांमध्ये साहिल नाईक, गोविंद परब, महेश वडाचेपाटकर, सुंदर पाटकर, डॉ.संजीव लिंगवत (वेंगुर्ला), वैभवी परब, विठ्ठल सावंत, चंद्रकांत गावडे, राहुल प्रभू, नितीन परब, शिवराम सावंत, कृष्णा गावडे, दशरथ गडेकर (आडेली), रामचंद्र परब, मनोहर तांडेल (नवाबाग, वेंगुर्ला), मंगेश माणगावकर, दूर्मिळ रक्तदाता नारायण उर्फ गिरीश प्रभू, सर्वेश घाडी, काशिराम परब, वासुदेव परब, महेश गवंडे, ओंकार बाबली गवंडे, अनुजा परब (भालावल), स्वप्नील परब, देवदास परब, दूर्मिळ रक्तदाता ओंकार कोरगावकर, सचिन कोंडये, प्रसाद नाईक, देवेंद्र परब तसेच रुपक मातोंडकर इत्यादी तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. ओंकार उदय गवंडे, नूतन पेडणेकर, सूर्यकांत गावडे व चंद्रकांत मेस्री हे रक्तदाते सुद्धा रक्तदान करण्यासाठी आले होते, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ते रक्तदान करु शकले नाहीत.
रक्तदात्यांचा (कै.) पांडुरंग महादेव नाईक यांच्या स्मरणार्थ त्यांचा पुतण्या साहिल गुरुनाथ नाईक पुरस्कृत सन्मानचिन्ह व सावंतवाडी रक्तपेढीमार्फत प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी बाहेर गावांतून येऊन रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचे युवा रक्तदाता मित्रमंडळाच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी सर्वश्री राजेश पेडणेकर, श्रीकृष्ण कोंडस्कर, भूषण मांजरेकर, वसंतराव तांडेल, प्रणव वायंगणकर, मनोहर तांडेल तसेच दशरथ गडेकर यांनी या कार्यक्रमाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन प्रसाद नाईक यांनी केले.

\