विशेष शिबिरे घेऊन कुडाळात विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले देणार…

35
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तहसीलदारांची संकल्पना; २० ते २२ जून या कालावधीत शिबिर…

कुडाळ,ता.१४: शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध व्हावेत, यासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या वतीने तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २० ते २२ जून या कालावधीत ही शिबिरे होणार आहेत. यावेळी संबंधित विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या संकल्पनेतून हे दाखले उपलब्ध होणार आहेत.

उन्हाळी सुट्टी संपुन आता शाळा, काॅलेजसह विविध कोर्सेस करिता प्रवेश सुरु झाले आहेत, त्यामुळे मुलांना आवश्यक असणारे दाखले वेळेत उपलब्ध व्हावेत याकरिता कुडाळ तालुक्यात माणगाव, कडावल व नेरूर-देवुळवाडा या ३ ग्रामपंचायत मध्ये २० जुन ते २२ जुन पर्यंत खास “दाखले शिबिर” आयोजित करण्यात आले आहे. यावेळी विद्यार्थी व नागरीकांनी दाखल्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे शिबिराच्या ठिकाणी सादर करावीत व पुढील चार दिवसात आपले दाखले स्विकारावेत असे आवाहन कुडाळ तहसिलदार श्री. वसावे यांनी केले आहे.

\