मराठा समाजातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही…

123
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकरांची ग्वाही; जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेणार…

सावंतवाडी,ता.१९: मराठा समाजातील मुलांचे काहीही झाले तरी शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही, ई.डब्ल्यू.एस दाखल्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून ते वितरीत करण्याच्या सूचना तहसिलदारांना देण्यात येतील असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिले आहे. याबाबत सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे यांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे लक्ष वेधले.

सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील यांच्या आडमुठ्या धोरणामुळे मराठा समाजाची मुले शिक्षणापासून वंचित राहू शकतात, याबाबत सावंतवाडी तहसिलदार यांना जाब विचारल्या नंतर श्री. गावडे यांनी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून याबाबतची माहिती दिली, तेव्हा श्री. केसरकर यांनी एकाही मराठा समाजाच्या मुलांवर शैक्षणिक अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, याबात आपण जातिनिशी लक्ष घालून, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल असे आश्वासन दिले.

\