हडीत एसटी बसला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार…

3928
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण ता.२०: दुचाकीने भरधाव वेगाने जाताना समोरून आलेल्या एसटी बसला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान हडी येथे घडला. शिवाजी लक्ष्मण सुर्वे (वय-२८) रा. हडी जठारवाडी असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील एसटी आगाराची मालवण-तांबळडेग (क्रमांक- एम एच-१४ बीटी -१७७९) ही बसफेरी जात असता हडी नागेश्वर मंदिर जवळच्या रस्त्यावर समोरून आलेल्या दुचाकी (क्रमांक एम एच ०७- एम- ०९७२) ची जोरदार धडक बसली. यात दुचाकीस्वार शिवाजी सुर्वे याचे डोके एसटी बसच्या पुढील भागास आपटल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती एसटीचे चालक धर्मांण्णा मौला नडगिरी यांनी पोलीस ठाण्यात फोनद्वारे कळविली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नांदोसकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल हेमंत पेडणेकर व पोलीस कॉन्स्टेबल प्रतीक जाधव यांनी घटनास्थळी जात अपघाताचा पंचनामा केला. अपघातात मृत्यू पावलेल्या शिवाजी सुर्वे याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मालवण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे.

\