सेंट्रल उर्दू हायस्कूल मध्ये आढळले जखमी अवस्थेत घुबड…

521
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता‌.२६: येथील सेंट्रल उर्दू हायस्कूल मध्ये घुबड पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला आहे. हायस्कूल मधील आयेशा शेख या विद्यार्थ्यांनीचे लक्ष जखमी असलेल्या घुबडाकडे गेल्याने ही बाब निदर्शनास आली. दरम्यान विद्यार्थी फरहान रजा, रोमान सिद्दीकी व शाळेतील शिपाई अतीक कोल्हापुरी, इक्बाल शेख यांच्या मदतीने त्या पक्षाला पकडून प्राथमिक उपचार करण्यात आले. दरम्यान याबाबत मुख्याध्यापक इकबाल मुलानी यांनी वनविभागाच्या श्री. राणे यांना संपर्क करून याबाबतची माहिती दिली. यावेळी राणे यांनी वनरक्षक महादेव गेजगे यांना त्या ठिकाणी पाठवले. दरम्यान त्या पक्षाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्यावर उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे गेजगे यांनी सांगितले.

\