बांदा येथील हॉटेल चालक संजय परब यांचा प्रामाणिकपणा…

607
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सापडलेली चैन केली परत; निगुडे ग्रामस्थांकडून सन्मान…

बांदा,ता.२६: येथिल सटमटवाडी परिसरातील हॉटेल चौरंगीनाथचे मालक संजय परब यांनी आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.त्या ठिकाणी निगुडे येथील गिरीश झांटये यांची सोन्याची चैन त्यांच्या हॉटेलमध्ये ते विसरून गेले होते.‌ मात्र श्री. परब यांनी ती त्यांना प्रामाणिकपणे परत केली आहे. याबद्दल निगुडे येथील माजी सरपंच झेवियर फर्नांडिस यांच्याकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. श्री. झांटये व त्यांचे मित्र असे मिळून त्यांच्या हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी गेले होते यावेळी झांटये यांची चैन त्या ठिकाणी पडली त्याची कल्पना ते घरी गेल्यानंतर त्यांना आली. यावेळी त्यांना दुसऱ्या दिवशी फोन करून संपर्क साधला असता त्यांनी आपल्याला चैन मिळाली असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांचा फर्नांडीस यांच्याकडून सन्मान करण्यात आला. यावेळी झेवियर फर्नांडिस, गिरीष झाट्ये, आशिष झाट्ये, सोयेब नेकनाल, भूषण साटेलकर, स्वप्नील पिळणकर उपस्थित होते.

\