नीट परीक्षेत यश प्राप्त करणाऱ्या सिद्धी भिडेचा ज्येष्ठ नागरिक संघाकडून सन्मान…

157
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२८: कर्क रोगासारख्या दुर्धर आजारावर मात करत नीटच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन करणार्‍या सिद्धी भिडे हिचा ज्येष्ठ नागरिक विकास मंच बांदाचे पदाधिकारी व सदस्य यांच्यावतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी सिद्धीचे आई- वडील ,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान, संघाचे खजिनदार जगन्नाथ सातोसकर, सचिव गुरुनाथ नार्वेकर, परिवाराचे सदस्य महादेव वसकर, अंकुश माजगावकर, अच्युत पिळणकर, तुळशीदास धामापूरकर आदी उपस्थित होते.
सिद्धीचे यश हे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक असून तिने यापुढेही असेच यश मिळवावे अशा सदिच्छा ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या.