काजूच्या झाडावरून खाली पडल्याने वृद्ध गंभीर…

2

केसरी-फणसवडेतील घटना; सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

सावंतवाडी ता.२०: काजू काढण्यासाठी झाडावर चढलेला एक वृद्ध तोल जाऊन खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास केसरी-फणसवडे येथे घडली.अंकुश रामा गावडे,असे जखमीचे नाव आहे.दरम्यान त्यांना प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.यावेळी सावंतवाडी पंचायत समिती सदस्य तथा भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप गावडे आदींसह तेथील ग्रामस्थांनी जखमीला मदत कार्य केले.

4

4