मग…आता दिपक केसरकर राजीनामा देणार का…?

373
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजन तेलींचा सवाल ; चांदा ते बांदा योजनेतील ९२ कोटी परत गेल्याचा दावा

सावंतवाडी.ता,०५:  जिल्हयासाठी चांदा ते बांदा योजनेतून आलेले तब्बल ९२ कोटी रूपये निधी कोरोनाच्या काळात परत गेला आहे.त्यामुळे माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे ते आता आपला राजीनामा देणार का?, असा सवाल माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे केला.दरम्यान वारेमाप पास दिल्यामुळे जिल्हयात कोरोनाचा शिरकाव झाला.त्याला थोपवण्यासाठी येथील प्रशासन पुर्ण पणे अपयशी ठरले.त्यामुळे आता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चाकरमान्यांच्या पुर्नवसनासाठी काय करू शकतो, याची चाचपणी सुरू आहे.त्याची सुरुवात उदया पासून कणकवलीतून होणार आहे.असेही श्री.तेली म्हणाले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब,नगरसेवक मनोज नाईक आदी उपस्थित होते.

तेली यांनी आज सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेतली.ते म्हणाले,कोरोनाचे संकट जिल्ह्यात उद्भवल्या नंतर पालकमंत्री तसेच येथील प्रशासनाला जिल्ह्यातील माजी आमदार खासदार तसेच विद्यमान आमदार खासदार सर्व क्षेत्रातील काम करणारे व्यक्ती यांची एकत्र बैठक घेऊन कोरोना चा सामना करण्यासाठी उपाय योजना आपल्या अशी मागणी केली होती.मात्र केवळ जिल्ह्यातील सर्व पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना घेऊन एक एक बैठक घेऊन आजमितीपर्यंत सर्वांची एकत्र बैठक झाली नाही.ही बैठक झाली असती,तर आज जिल्ह्यात १०५ एवढी रुग्णसंख्या झाली नसती.जिल्ह्याच्या विचार करता संस्थात्मक विलगीकरण आत असलेल्या साखर मन्ना एक रुपयाची मदत शासन करत नाही.सरपंच व रात्रमान यामध्ये गावागावांमध्ये वाद निर्माण झाले आहेत.असे असतानाही भाजपाने राजकारण न करता जिल्ह्यात सामाजिक भावनेतून विविध गोष्टी राबवल्या आहेत.त्यामुळे एकीकडे सत्ताधारी या ठिकाणी राजकारण करत आहेत.
श्री तेली म्हणाले आज जिल्ह्यातील ग्रामपंचायतीला प्राप्त असलेला १४ वित्त आयोगाचा निधी तसेच ९२ कोटी रुपये चांदा ते बांदा योजनेचे परत गेले आहेत.त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्यांनी आपले पैसे गुंतवले होते.ते अडचणीत आले आहेत.या अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील लोकांना सत्ताधारी आमदार खासदार त्यांचे पैसे परत देणार आहेत का, जिल्ह्याचा विचार करता आरोग्य खात्यातील ६२५ पदे रिक्त आहेत हा आकडा लक्षात घेता धोरणाचा मुकाबला करण्यासाठी घेतली आरोग्य यंत्रणा सक्षम आहे का त्यामुळे राजकारण न करता लॅब कुठेही सुरु करा पण ती लवकर सुरू करा असा चिमटाही त्यांनी सत्ताधाऱ्यांना काढला.जिल्ह्यात कोरोना ची वाढती संख्या लक्षात राज्य शासनाने मधल्या काळात योग्य निर्णय घेतला पाहिजे होता.हा निर्णय घेतला असता,तर रुग्ण संख्या वाढली नसती तसेच जिल्हा प्रशासनाने तालुक्याच्या ठिकाणी असलेली मोठ्या संस्था मंगल कार्यालय आधी ताब्यात घेतले असता तर गावागावांमध्ये निर्माण झालेले वाद झाले नसते एकूणच कोणाच्या या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पूर्णता अपयशी ठरला आहे आरोपही श्री तेली यांनी केला.
कोरोना नंतर पुढे काय याबाबत जिल्हा भाजप रणनीती आखणार आहे यासाठी उद्या कणकवली येथे बैठक पार पडणार असून यामध्ये रोजगार निर्मिती कशाप्रकारे करता येईल त्यासाठी कोणते प्रयत्न केले जावे याबाबत चर्चा विनिमय करण्यात येणार आहेत असे तेली यांनी यावेळी सांगितले.

 

\