जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी नागरिकांचा पाठिंबा…

105
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग कृती समितीचा पुढाकार; लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची मागणी…

वेंगुर्ला,ता.०७: सिंधुदुर्ग जिल्ह्यात “शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय” लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती सभापती, वेंगुर्ला, कुडाळ नगराध्यक्ष व काही ग्रामपंचायत ना निवेदन देण्यात आली.
जिल्ह्यासाठी ही काळाची गरज असून आपण लोकप्रतिनिधी व अधिकारी या नात्याने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी या वेळी निवेदन कर्त्यांनी केली. यावेळी सावंतवाडी सौरभ आईर, मुन्ना आजगाकर,
सच्चिदानंद ठाकूर, रोशन राऊळ ,
विनय वाडकर, शुभम घावरे, दोडामार्ग.. अभिमन्यू गवस , राजेश कोरगावकर, मिलिंद नाईक, गोविंद टेंबकर, प्रभाकर मयेकर, हर्षद तंबुळकर , बाळकृष्ण कोरगावकर, विशाल चव्हाण , समीर शिरोडकर व नवकिरण युवा मंच सुरुची वाडी दोडामार्ग चे सदस्य उपस्थित होते. कणकवली लक्ष्मण गावडे,
नितीन तावडे, दिग्विजय राणे, प्रथमेश वरवडेकर,संदेश सावंत-पटेल मालवण मध्ये सायली आचरेकर, स्वाती पारकर, निधी मुणगेकर देवगड सौ.पुर्वा प्रसाद सावंत , सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान सिंधुदुर्ग सचिव, आरती सुरेश धुरी स्वप्नाली राकेश वाल्मिकी, कुडाळ येथून जय पडते, आशिष राऊळ, विवेक बोभाटे, शंकर पंदारे, ज्ञानेश सरनोबत, महादेव शिरोडकर, दैवेश रेडकर, मोहन मांजरेकर, रमाकांत नाईक वेंगुर्ला येथील यशवंतगड शिवप्रेमी, सिंहगर्जना ग्रुप वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान ग्रुप, तुळस चे रुपाली परब, वैशाली वडर, अभिषेक रेगे, भुषण मांजरेकर, सरोज परब, सुकन्या परब, सौरभ नागोळकर,संपदा राणे, साईप्रसाद भोई, राहुल मरुडेकर,सौरभ धुरी, अमित नाईक, प्रणव वायगणकर, रोहन नाईक, सुरज मालवणकर, प्रा.सचिन परुळकर सर, महेश राऊळ, विवेक तिरोडकर, प्रशांत सावंत, किरण राऊळ, निखिल ढोले, सोनाली आंगचेकर, वैभव होडावडेकर,प्रसाद परुळकर उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृती समिती जिल्हा सिंधुदुर्ग कडून मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांना वारंवार निवेदन सादर करण्यात आली आहेत. तसेच जन जागरण करून २५००० नागरिकांनी पोस्ट कार्ड व १३० ठराव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका , नगर पंचायत यांनी पारीत केलेले ठराव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्फत तत्कालिक मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले. १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाक्षणिक उपोषण पण प्रांताधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. तसेच जिल्ह्यात नागरिकांनी मेल करून आपली मागणी मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत पण पोचवली आहे. मुख्यमंत्री महोदय पण यासाठी सकारात्मक असून त्यांनी १९ जून २०२० रोजी कोविड टेस्ट लॅब लोकार्पण वेळी “शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय” ची मागणी पूर्ण करू असे सांगितले आहे. याचा पुनरुच्चार ३ जुलै २०२० रोजी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्स वेळी केला व त्याच वेळी पालकमंत्री यांनी सांगितले होते की महिना भरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्गचा प्रस्ताव मंत्रिमंडळसमोर येईल. आता जिल्ह्यातील नागरिकांना मंत्रिमंडळ मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा असून मुख्यमंत्री व सरकार सकारात्मक असताना जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी यासाठी आमदार, खासदार व आपल्या वरिष्ठाजवळ ही मागणी लावून धरून मंत्रिमंडळ मंजुरी व प्रत्यक्ष भूमिपूजन होऊन लवकर वैद्यकिय महाविद्यालय ची स्थापना होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी या निवेदन द्वारे करण्यात आली आहे.

\