पगारासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर शासनाला नोटीस देण्याची वेळ…

85
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रसन्ना देसाई; अन्यथा “भिक मांगो आंदोलन”, जमलेले पैसे मुख्यमंत्री फंडाला देणार…

वेंगुर्ला,ता.०७: शासनाच्या उदासीन धोरणामुळे कोरोना सारख्या महारोगाच्या कालावधीत देवदूताप्रमाणे काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना गेल्या २ महिने पगार नसल्याने त्यांना शासनास नोटीस देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने पितळ उघडे पडले आहे.  याबाबत आठवड्यात पगार न दिल्यास भाजपतर्फे आंदोलन करण्यात येणार असून याप्रश्नी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधणार असल्याचा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
एकीकडे शिवसेनेचे पालकमंत्री, खासदार, आमदार हे जिल्ह्यात मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा करून जनतेची दिशाभूल करत आहेत. तर दुसरीकडे शासनाकडे वैद्यकीय अधिकारी यांचे दोन महिन्याचे पगार देण्यासाठी पैसे नाहीत. आणीबाणीच्या  काळातील बंदीवानांसाठी भाजपा सरकारने सुरु केलेली योजना, कोरोनामुळे तिजोरीवर होणारा परिणाम आणि आर्थिक संकट यामुळे बंद केली.
गणेशोत्सव अवघ्या १५  दिवसांवर येवून ठेपला आहे. रोज शेकडो चाकरमानी आपापल्या  गावी येत आहेत. त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्य अधिकारी नसतील तर मोठा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर वैद्यकीय अधिकाऱ्याचे पगार व्हावेत अशी भाजप च्या वतीने मागणी करणार असल्याचेही देसाई यांनी नमूद केले आहे. तसेच याबाबत ९ ऑगस्ट रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे याप्रश्नी लक्ष वेधणार असल्याचे  प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान येत्या आठ दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्यांचा पगार न दिल्यास भाजपा तर्फे “भिक मांगो आंदोलन” करुन शासनाचा निषेध करत जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री फंडास प्रतिकात्मक रुपात जमा करावी लागेल, असा इशारा भाजपाचे जिल्हा सरचिटस प्रसन्ना देसाई यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.

\