कणकवली शहरात ८ ठिकाणी कंटेन्मेंट झोन…

311
Containment zone
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी, ता. २४ :कणकवली शहरात विद्यानगर घर नं. ११/१६ अ,ब,क, घर व परिसर, सोनगेवाडी घर नं. २/३२१ घर व परिसर, शिवाजीनगर घर नं. ४/२३६ घर व परिसर, सावंतचाळ, मधलीवाडी घर व परिसर, चौंडेश्वरी मंदिर नजीक कांबळे गल्ली, घर नं. १/५५२ घर व परिसर, हर्णेआळी घर नं. २/१०१ घर व परिसर, जळकेवाडी प्रियद्रर्शनी अपार्टमेंट बी विंग व परिसर, बांधकरवाडी, घर नं. ४/९४६ घर व परिसर, कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

संबंधित कंटेन्मेंट ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत रात्री १२.०० पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणार्‍याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम ५१ व ५८ अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, १९५१ चे कलम ७१,१३९ तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कणकवलीच्या उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिले आहेत.

\