वैभववाडीत उद्या आत्मनिर्भर अंतर्गत मार्गदर्शन मेळावा…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पंचायत समितीच्या सभागृहात आयोजन; नितेश राणे राहणार उपस्थित…

वैभववाडी ता.१३: वाभवे-वैभववाडी नगरपंचायतच्या वतीने उद्या सायंकाळी ३ वाजता आत्मनिर्भर भारत या योजनेचा गरजू लाभार्थ्यांना लाभ व्हावा.या उद्देशाने आत्मनिर्भर भारत अंतर्गत मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.वैभववाडी पं.स. च्या सभागृहात हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत. तसेच आत्मनिर्भर जिल्हा संयोजक, बँक संचालक अतुल काळसेकर, कणकवली विधानसभा संयोजक प्रमोद रावराणे, जि.प. माजी उपाध्यक्ष नासीर काझी, वैभववाडी संयोजक भालचंद्र साठे, जिल्हा बँक संचालक गुलाबराव चव्हाण, शहर संयोजक संजय चव्हाण आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या मेळाव्याला गरजू व पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा सौ. समिता कुडाळकर यांनी केले आहे.

\