परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतक-यांना भरपाई द्या…

80
2
Google search engine
Google search engine
Google search engine

महेंद्र सांगेलकर; महसूलमंत्री थोरात यांच्याकडे सावंतवाडी काँग्रेसची मागणी…

सावंतवाडी,ता.१३: परतीच्या पावसामुळे तालुकात झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी,अशी मागणी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
याबाबत त्यांनी निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसात झालेल्या परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.ऐन हंगामात हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे कापून वाळत टाकलेले पीक कुजून गेलेले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसान भरपाईचा आकडा मोठा आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,अशी विनंती केली आहे.

\