कोरोनाची दुसरी लाट येतेय त्यामुळे आता काळजी घ्या…

617
2
Google search engine
Google search engine
Google search engine

परिमल नाईक ; व्यायामशाळा,मॉल,सुरू झाले,तरी खबरदारी घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.१९: कोरोनाची दुसरी लाट येत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील आणि विशेषतः सावंतवाडीतील नागरीकांनी आपली काळजी घ्यावी.जेष्ठ नागरीकांनी त्या पेक्षा ही दक्षता घ्यावी,असे आवाहन सावंतवाडी पालिकेेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक परिमल नाईक यांनी केली आहे.
दरम्यान शासनाकडुन जरी मॉल, हॉटेल, व्यायामशाळा आदी गोष्टी सुरू करण्यात आल्या असल्या,तरी नागरीकांनी आपल्या जिवावर उदार होवू नये आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.श्री.नाईक यांनी याबाबत प्रसिध्दीपत्रक दिले आहे.त्यात त्यांनी,असे नमुद केले आहे की देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढ होत आहे, अशा परिस्थितीत दिल्ली सारख्या मोठ्या राज्यात पुन्हा लॉकडाउन लावण्यासंदर्भात विचार विनिमय सुरू आहे.त्यामुळे ती झळ जिल्ह्याला आणि पर्यायाने सावंतवाडी शहराला बसू नये,यासाठी नागरीकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी,असे श्री नाईक यांनी म्हटले आहे.

\