गोव्याकडे जाणार्‍या पर्यटकांची संख्या मंदावली ही वस्तूस्थिती…

480
2
Google search engine
Google search engine
Google search engine

राजू भालेकर; जिल्हा प्रशासनाने योग्य ती जनजागृती करण्याची गरज…

सावंतवाडी,ता.२७: राज्य शासनाकडुन सीमा तपासणी नाक्यावर पर्यटकांची स्क्रिनिंग तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंंतर गोव्याकडे जाणार्‍या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.ही वस्तूस्थिती आहे,असा दावा सावंतवाडी येथिल भालेकर खानावळीचे मालक राजू भालेकर यांनी केला आहे.दरम्यान ऐन पर्यटन हंगामात अफवा उठल्याचा हा परिणाम आहे.गोव्यात गेलेल्या अनेक लोकांनी आपली बुकींग कॅन्सल करुन परत जाणे पसंत केले.ही वस्तूस्थिती आहे.त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेवून योग्य तो निर्णय घ्यावा,अन्यथा येथिल व्यावसाय आणि पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांना त्याचा मोठा फटका सहन करावा लागणार आहे,असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.भालेकर म्हणाले, दिवाळी सुट्टीत या ठीकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले होते.काही सोडले तर अनेक पर्यटकांकडुन कोरोनाच्या कालावधीत शासनाकडुन घालून देण्यात आलेले नियम पाळले जात होते.अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाकडुन वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेवून सिमा तपासणी नाक्यावर पर्यटकांची स्क्रिनिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याचा काही लोकांकडुन विपर्यास करण्यात आला.आणि काही लोकांकडुन चुकीच्या पध्दतीने अफवा पसरविण्यात आल्या. त्यामुळे पर्यटकांची संख्या गेले चार ते पाच दिवस कमालीची घटली आहे.त्यामुळे याबाबत शासनाकडुनआणि विशेषतः जिल्हा प्रशासनाकडुन योग्य ती जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्यथा जिल्ह्यातील हॉटेल,लॉज व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येणार आहे,असे त्यांनी सांगितले.

\