पेहेचान फाऊंडेशनच्यावतीने बांदयात गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

270
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०१:  पेहेचान फौंडेशनच्या वतीने बांदा शहरातील गरजू मुलांना मोफत जीवनावश्यक वस्तूंचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी फौंडेशनच्या तेजा कदम, विकी कदम, पंकज कदम, सरपंच अक्रम खान, भाजपचे सावंतवाडी तालुका सरचिटणीस दादू कविटकर, बाबा काणेकर आदी उपस्थित होते. दरवर्षी फौंडेशनच्या माध्यमातून समाजातील गरीब व गरजू मुलांना वस्तूंचे वाटप करण्यात येते.
यावेळी बोलताना अक्रम खान म्हणाले की, पेहेचान फौंडेशनचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या कार्यासाठी आमचे नेहमी सहकार्य राहील. प्रास्ताविकात तेजा कदम यांनी फौंडेशनच्या सामाजिक कार्याची माहिती दिली.

\