कणकवलीत ज्येष्ठ व्यापारी उदय वरवडेकर यांचे निधन…

273
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.१५ : शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी तसेच वरवडे गावचे माजी सरपंच चंद्रशेखर उर्फ उदय हरी वरवडेकर (वय ६५) यांचे मंगळवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुiणालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले, अशा प्रतिक्रिया विविध मान्यवरांनी व्यक्त केल्या आहेत.

उदय वरवडेकर यांचे कणकवलीच्या सामाजिक, सांस्कृतिक, व्यावसायीक जडणघडणीत कायमच योगदान राहिले. महामार्ग चौपदरीकरण अंतर्गत प्रकल्पग्रस्त मागण्यांना वाचा फोडण्यासाठी ते नेहमीच आघाडीवर होते. त्यांचे कणकवली येथे जुन्या काळापासून वालावलकर आणि कंपनी या नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. तसेच शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली या संस्थेचे ते कार्यकारिणी सदस्य होते. वरवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, काँग्रेस नेते स्व. भाई सावंत, स्व. विजय नाईक यांचे ते अत्यंत निकटवर्तीय होते.
सुमारे पंधरा – वीस दिवसांपूर्वी `कोरोना’ची लागण झाल्यानंतर ते त्यातून कोरोनामुक्तही झाले होते. मात्र त्यानंतरहि त्यांना बरे वाटत नसल्याने कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील उपचारामुळे त्यांची प्रकृती सुधारत होती. लवकरच त्यांना डिस्चार्जही देण्यात येणार होता. मात्र, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास त्यांची प्रकृती अचानक खालावली व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.

\