जिलेटीन स्फोटात जखमी झालेल्या दोघा परप्रांतीय तरुणांना गटारात फेकले….

1475
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोडामार्ग-मणेरीतील घटना; प्रकरण दडपण्यासाठी मुकादमाकडून जीवघेणे कृत्य

दोडामार्ग,ता.२८: जिलेटीन स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघा कामगारांना थेट गटारात फेकुन अपघाताचा बनाव रचू पाहणाऱ्या एका परप्रांतीय मुकदमाकडुन झालेला जीवघेणा प्रकार शिवसेनेचा तालुका प्रमुखांमुळे उघड झाला. विशेष म्हणजे या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले आहेत. यातील एकाच्या हाताचे तुकडे झाले असून दुसरा गंभीर जखमी झाला असल्याचे सांगण्यात आले. हा प्रकार आज दोडामार्ग तालुक्यातील मणेरी गावात घडला. त्यांना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गटारात फेकण्यात आले होते. मात्र कण्हण्याचा आवाज आल्यामुळे हा सर्व प्रकार उघड झाला.
याबाबतची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात असलेल्या क्वारीवर हे दोघे कामगार काम करत होते. ते त्या ठिकाणी सध्या क्वारी बंद असल्यामुळे त्याठिकाणी वापरण्यात येणारी जिलेटिन त्यांच्या ताब्यात होते.
ते घेऊन हे दोघे कामगार मणेरी परिसरातील धरणावर मासेमारी करण्यासाठी गेले होते. मात्र जात असताना हातातच त्या जिलेटीनचा स्फोट होऊन ते दोघे गंभीर जखमी झाले. त्यामुळे हा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून संबंधित मुकादमाने त्या दोघांना तशाच प्रकारे रक्तबंबाळ अवस्थेत घेऊन मणेरी परिसरातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारात फेकले. परंतु त्यांचे दैव चांगले असल्यामुळे हा प्रकार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघड झाला. यावेळी श्री.धुरी यांच्या समवेत त्यांचे सहकारी सज्जन धाऊसकर यांनी त्या दोघांना तात्काळ घेऊन दोडामार्ग प्राथमिक आरोग्य केंद्र गाठले. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या डॉ.ज्ञानेश्वर एवाळे यांनी त्यांच्यावर उपचार केले. मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी ते पाठविण्यात आले. हा सर्व प्रकार बाहेर येवू नये यासाठी संबंधित मुकादमाने त्या दोघांना गटारात फेकले असावे, असा अंदाज श्री धुरी यांनी व्यक्त केला आहे. संबंधित जखमी रूग्णांचे नाव कळू शकले नाही. ते विजापूर परिसरातील आहेत. याबाबत अधिक तपास पोलिस केल्यानंतर पुढील माहिती स्पष्ट होईल,असे धुरी म्हणाले.

\