सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा सहकुटुंब स्नेहमेळावा उत्साहात

249
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.२३:
सिंधूदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचा सहकुटुंब स्नेहमेळावा रविवारी २१ मार्च रोजी अणाव येथील राणे कृषि पर्यटन केंद्रात उत्साहात पार पडला. पत्रकार हे नियमी एकत्र येवून काम करीत असतात. परंतु एका पत्रकाराच्या कुटुंबियांची ओळख दुसऱ्या पत्रकाराच्या कुटबियांशी नसते. ही ओळख व्हावी. पत्रकार यांच्या बरोबर त्यांचे कुटुंबिय एकसंघ रहावे, यासाठी हा स्नेहमेळावा रविवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, उपाध्यक्ष बाळ खडपकर, सहसचिव देवयानी वरसकर, मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर, सचिव नंदकुमार आयरे, उपाध्यक्ष लवू म्हाडेश्वर, माजी अध्यक्ष संदीप गावडे, सहसचिव सतीश हरमलकर, खजिनदार दत्तप्रसाद वालावलकर, विनोद दळवी, मनोज वारंग, विनोद परब यांच्यासह त्यांचे कुटुंबिय सहभागी होते. कोणत्या तरी हॉटेलमध्ये आनंद बंदिस्त करण्यापेक्षा निसर्गाच्या सानिध्यात जात हा आनंद खुल्या वातावरणात साजरा करण्याचा निर्णय मुख्यालय पत्रकार संघाने घेतला होता. त्यानुसार रविवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
काही पत्रकारांच्या कुटुंबियांची एकमेकांशी ओळख होती. अनेकांना ऐकून माहित होते. मात्र, रविवारी स्नेहमेळावा निमित्ताने सर्वांची पक्की ओळख होण्यास मदत झाली. सर्व कुटुंबिय एकमेकांत मिसळली होती. यानिमित्त मुलांनी एकत्र येत रेन डान्स केला. मुले व महिला यांची संगीत खुर्ची, आदी खेळ घेण्यात आले. यानंतर सर्व पत्रकार मित्रांनी आपल्याला येत असलेली कला सादर केली. यापूर्वी पत्रकार मित्रांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित पैकी काही महिलांनी अशाप्रकारे कार्यक्रम आयोजित करीत आपली पत्नी व मुले यांना सामावून घेतल्याबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना गणेश जेठे यानी, उपस्थित कुटुंबियाना उद्देशुन तुम्ही पत्रकारांच्या फॅमिली आहात. हे तुमचे भाग्य आहे. कारण पत्रकार हे समाजसेवेचे व्रत घेतलेले असतात. त्यामुळे ते आर्थिक दृष्टया कुटुंबाला सुखी ठेवतील, असेच नाही. परंतु, त्यांना समाजात मिळणारा मान तुमचाही स्वाभिमान उंचावणारा असतो, त्यामुळे तुम्ही भाग्यवान असल्याचे सांगितले. यावेळी नूतन अध्यक्ष संजय वालावलकर यानी, मुख्यालय पत्रकार संघ या पुढेही कार्यक्रम आयोजित करीत कुटुंबियाना सहभागी करून घेईल, असे सांगितले. मावळते अध्यक्ष संदीप गावडें यानी, गेली अनेक वर्षे हा उपक्रम राबविण्याचा विचार आमच्या मनात होता. आज तो प्रत्येक्षात उतरला, असे सांगितले. यावेळी बाळ खडपकर, देवयानी वरसकर यानीही विचार मांडले. सुमारे चार तास एकत्र येत मुख्यालय पत्रकारांच्या कुटुंबियानी एक वेगळा दिवस उपभोगला. स्नेह भोजनाने या स्नेहमेळाव्याचा समारोप झाला.

 

\