बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध…

280
2
Google search engine
Google search engine
Google search engine

लसीकरणाला आजपासून सुरूवात; २०० जणांनी घेतला लाभ…

बांदा ता.१८: प्राथमिक आरोग्य केंद्राला ४५० कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध झाल्या असून आजपासून लसीकरण सुरू करण्यात आले. आज २०० जणांना लसीकरण करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी दिली.
लसचा तुटवडा असल्याने गेले काही दिवस लसीकरण बंद होते. काल शनिवारी आरोग्य केंद्राला ४५० लसींचा पुरवठा करण्यात आला. आज सकाळी ९ वाजता लसीकरण मोहीमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. पाटील, डॉ. मयुरेश पटवर्धन, सरपंच अक्रम खान यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लस देण्यासाठी नियोजन केले.
पहिला डोस घेतलेल्या लाभार्थींना दुसरा डोस देण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले. लाभार्थ्यांची गर्दी होऊ नये यासाठी २०० जणांचे नियोजन करण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना उद्या सोमवारी लस देण्यासंदर्भात नियोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली. आज दुपारी १ वाजेपर्यंत २०० जणांना लसीकरण करण्यात आले.

\