खारेपाटण बाजारपेठ आठ दिवस कडकडीत बंद राहणार…

162
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ग्रामसनियंत्रण समिती आणि स्थानिक व्यापार्‍यांची बैठक ; एकमुखी बंदचा निर्णय…

कणकवली, ता.१९: कोरोनाची साखळी तोडण्यासाठी खारेपाटण बाजारपेठ २२ ते २९ एप्रिल अशी आठ दिवस कडकडीत बंद राहणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय झालेल्या स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती आणि व्यापारी बांधव यांच्या बैठकीत हा निर्णय झाला.
आज झालेल्या या बैठकीत २२ एप्रिल पासून पुढील आठ दिवस खारेपाटण बाजारपेठ संपूर्ण बंद ठेवण्याचा सामूहिक निर्णय एकमताने घेण्यात आला. यात मेडिकल स्टोअर्स व खासगी दवाखाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडे राहतील. तसेच दूध विक्रेत्यांनी ग्राहकांना दूध घरपोच द्यावयाचे आहे. खारेपाटण ग्रामस्थ व व्यापारी या सर्वांनी मिळून घेतलेल्या या निर्णयाचे जे कोणी उल्लंघन करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तसेच खारेपाटण मधील रिक्षा व्यावसायिक तसेच अन्य छोटे – मोठे वाहतूक व्यावसायिक यांनी देखील बाजारपेठ बंद मध्ये सहभाग घेऊन पुढील आठ दिवस कोरोना साखळी तोडण्यास मदत करायची असल्याचे यावेळी ठरविण्यात आले.
खारेपाटण गाव ग्राम सनियंत्रण समिती चे अध्यक्ष तथा खारेपाटण सरपंच रमाकांत राऊत यांचा अध्यक्षतेखाली खारेपाटण ग्रामपंचायत कार्यालय येथे संपन्न झालेल्या या सभेला उपसरपंच इस्माईल मुकादम, ग्रामपंचयत सदस्य महेंद्र गुरव, शमशुद्दीन काझी, योगेश पाटणकर, खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिया वडाम, खारेपाटण व्यापारी असोसिशनचे अध्यक्ष केतन आलते, खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे अधिकारी पराग मोहिते, रमेश नारवर, ग्रामविकास अधिकारी जि. सी. वेंगुर्लेकर, समितीचे सचिव तथा खारेपाटण तलाठी यु. वाय. सिंगनाथ, खारेपाटण गाव तंटामुक्ती समिती अध्यक्ष मंगेश गुरव, खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, महेश कोळसुलकर, पोलीस पाटील दिगंबर भालेकर, माजी पोलीस पाटील बाळा शेट्ये, मेडिकल असोसिएशनचे अनिल देवस्थळी, शेखर राणे, व्यापारी समितीचे सुधीर कुबल, संजय धाक्रस, आदी प्रमुख मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

\