सावंतवाडी आगारातून उद्यापासून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या…

111
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी ता.२७: येथील आगारातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या काही लांब पल्ल्याच्या व ग्रामीण भागातील बसफेऱ्या उद्यापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत.अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली.दरम्यान कोरोना प्रतिबंध नियमांचे पालन करून प्रवाशांनी सेवेचा लाभ घ्यावा,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.याबाबत श्री. पडोळे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सावंतवाडी ते पुणे आंबोली मार्गे ०७:१५ वा.,सावंतवाडी ते तुळजापूर आंबोली मार्गे ९:०० वा.,सावंतवाडी ते पुणे निगडी (शिवशाही ) १८:४५ वा.,सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे १०:३० वा.,सावंतवाडी ते कोल्हापूर आंबोली मार्गे १३:४५ वा.,सावंतवाडी ते रत्नागिरी ०७:३०, १०:०० व १३:०० वा.तर ग्रामीण भागातील बस फेऱ्यांमध्ये सावंतवाडी – दोडामार्ग ०७:१५, ०९:००, १२:३० व १७:०० वा.,सावंतवाडी – शिरोडा ०७:००, ०८:००, १३:३० व १७: ०० वा., सावंतवाडी – शिरशिंगे गोठवेवाडी :- ०८:०० व १३:०० वा.,सावंतवाडी – पारपोली ०८:००, १२:९० व १५:०० वा.,सावंतवाडी – शिवापूर :०७:३० व १३:३० वा.,सावंतवाडी – कालिका मंदिर ०९:३० व १२:०० वा. सुटणार आहेत.

\