सावंतवाडी रुग्णालयातील रक्तपेढी तात्काळ रक्त साठवणुकीच्या पिशव्या उपलब्ध करून द्या…

31
2
Google search engine
Google search engine
Google search engine

युवा रक्तदाता संघटनेची वैद्यकीय अधीक्षकांकडे मागणी; अन्यथा भीक स्वरूपात आम्ही “त्या” देऊ…

सावंतवाडी ता.०२: येथील उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत तात्काळ रक्त साठवणूक करण्यासाठी पिशव्या उपलब्ध करून  द्या,अशी मागणी आज युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.उत्तम पाटील यांच्याकडे केली.दरम्यान सात दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास भिक स्वरूपात “त्या” संघटनेच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देऊ,असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.यासंदर्भात श्री.सूर्याजी यांनी डॉ.पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे वसंत सावंत, राघवेंद्र चितारी , पार्थिल माठेकर, डॉ.मुरली चव्हाण आदी उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकमध्ये असणाऱ्या कमतरतांबाबत युवा रक्तदाता संघटनेने लक्ष वेधल. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत रक्त स्टोअर करण्यात येणाऱ्या ‘ब्लड बॅग्सची’ कमतरता असल्याने रक्तदान शिबीरे घेण्यास अडचणी येत आहेत.कोव्हीड काळात रक्ताची आवश्यकता असताना या बॅग्स अत्यावश्यक आहे.तर ब्लड स्टोअर वातानुकूलित रूममधील एसी बंद अवस्थेत आहे.त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवल्या जात असून उंदीर मशीनरी-सामानाची नासधूस करत आहेत.त्याच बरोबर महत्वाची कागदपत्रे ठेवण्यासाठी कपाट याठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे येत्या ७ दिवसांत हे प्रश्न तातडीने मार्गी लावावेत,अशी मागणी त्यांनी केली.

\