किरकोळ, घाऊक व्यापाऱ्यांना उद्योग दर्जा…

53
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विजय केनवडेकर ; केंद्र सरकारचे मानले आभार…

मालवण, ता. ३ : सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने आज रिटेल व होलसेल व्यापार यांना एम एस एम ई मध्ये समाविष्ट करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने भाजपा उद्योग व्यापार आघाडी महाराष्ट्र प्रदेश मार्फत करण्यात आली होती. मागणीचा पाठपुराव्याला यश मिळाले असून आता सर्व किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना उद्यम रजिस्ट्रेशन करता येणार आहे अशी माहिती भाजपा उद्योग व्यापार आघाडी सेलचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली.
सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना मिळत असलेल्या बँकांच्या सवलती या सुद्धा उपलब्ध होणार आहेत. प्रामुख्याने आजपर्यंत बँका रिझर्व्ह बँकेच्या प्रियाॅरिटी लेंडिंग गाईडलाईन्स प्रमाणे फक्त उद्योगांना प्रियाॅरिटी सेक्टरमध्ये लोन दिले जात होते. आता ते किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांना सुद्धा उपलब्ध होईल. भारतात जवळजवळ अडीच कोटीच्यावर व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापारी बांधवांना व पर्यटन व्यावसायिकांना या योजनेचा फायदा होणार आहे. सिंधुदुर्ग भाजप उद्योग आघाडीच्यावतीने या योजनेची तालुकावार माहिती देण्यासाठी दौरा करणार असुन जास्तीत जास्त व्यापारी बांधवांना या योजनेचा फायदा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
पहिल्या लॉकडाऊन नंतर छोट्या मुदतीचे व रक्कमेचे अर्थसहाय जिल्ह्यातील फिरते व्यापारी बांधवांना सर्वात जास्त फायदा मिळवुन देण्यास उद्योग व्यापार आघाडी यशस्वी झाली होती. नवीन योजनेतील अनेक सवलती व अनेक योजना कालांतराने या क्षेत्रासाठी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे. एका अर्थाने कोरोना काळात अडचणीत आलेल्या सर्व व्यापाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांनी संरक्षित केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याबद्दल भाजपा उद्योग आघाडीच्यावतीने जिल्ह्यातील सर्व व्यापारी बंधुंचे अभिनंदन व केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.

\