बांद्यात मुसळधार,तेरेखोल नदी पात्राने ओलांडली धोक्याची पातळी…

119
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पुराचे पाणी आळवाडी-मच्छीमार्केट बाजारपेठेत घुसले ; निमजगा रस्ता पाण्याखाली…

बांदा,ता.१४:
रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने येथील तेरेखोल नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहे. आज सायंकाळी उशिरा नदीच्या पुराचे पाणी पात्राबाहेर येऊन बांदा शहरातील आळवाडी-मच्छीमार्केट बाजारपेठेत घुसले. शहरातील आळवाडी-निमजगा रस्ता पाण्याखाली गेला आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविले आहे. शहरातील निमजगा-वाफोली रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद होती.
हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर बांदा शहर व परिसरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत आहे. आज दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे सायंकाळी तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी मच्छीमार्केट परिसरात भरण्यास सुरुवात झाली. पाण्याचा वेग वाढत असल्याने व्यापारी व स्थानिकांची एकच तारांबळ उडाली. आळवाडी येथील अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. पाण्याची पातळी वाढू लागल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्यात.

\