देशातील मोफत लसीकरणामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या; रामेश्वर तेली….

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दिल्ली,ता.१३: देशात केल्या जाणाऱ्या मोफत लसीकरणामुळे पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, असे विधान केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी केले आहे. ९ ऑक्टोबरला आसाममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे.
देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी शंभरी गाठल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. यातच केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी मोठं विधान केलं आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ९ ऑक्टोबर रोजी आसाममध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना श्री. तेली यांनी हे विधान केलं आहे. “इंधनाच्या किंमती काही वाढलेल्या नाहीत. पण त्यात करांचा समावेश आहे. त्यामुळे इंधन महागलं आहे. तुम्ही मोफत कोरोना लस घेतली असेलच, मग यासाठीचा पैसा कुठून येणार? जनतेकडून कोणत्याही पद्धतीचं शुल्क लसीकरणासाठी घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे इंधनावरील कराच्या माध्यमातून ते गोळा केलं जात आहे”, असं श्री तेली यांनी म्हटलं आहे.

\