व्हायचे होते मुंबईचा “महापौर”, मात्र झालो आमदार…

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नारायण राणेंकडुन आठवणींना उजाळा; कोकणची वेगळी ओळख “दिल्लीला” करुन देणार…

सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता.२८:
माझ्या मनात मुंबईचे महापौर व्हायचे होते. त्यामुळे खुद्द बाळासाहेब ठाकरेंनी कोकणची जबाबदारी दिली असताना मी आमदार पद नको असे वारंवार सांगितले. तरीही त्याकाळचे माझा जवळ असलेल्या राजन तेली, परशुराम उपरकर आणि वसंत केसरकर यांनी आपल्याला आमदार की दया अशी शिवसेना प्रमुखांकडे गळ घातली. त्यामुळे मी आमदार झालो अशा आठवणींना आज येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उजाळा दिला.
आता मी मंत्रीपद स्विकारल्यानंतर केंद्रात तयारीत गेलो. त्या ठीकाणी महाराष्ट्र आणि कोकणची वेगळी ओळख दिल्लीला करुन देणार आहे. बॅ नाथ पै, मधू दंडवते यांच्या सारखे माझे सुध्दा नाव घेतले जावे त्या दृष्टीने माझे काम सुरू आहे असेही राणे म्हणाले.
श्री. राणे यांनी आज या ठीकाणी पालिकेला भेट दिली. यावेळी आयोजित कार्यक्रमात उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, मी सलग तीन वेळा बीएसटी चेअरमन म्हणून काम केले. त्यावेळी माझे मुंबईचा महापौर बनण्याचे स्वप्न होते. मात्र त्यावेळी माझे सहकारी असलेल्या तेली, केसरकर आणि उपरकर यांनी मला आमदारकी दया अशी गळ बाळासाहेबांकडे घातली. यावेळी त्यांनी माझ्याकडे कोकणची जबाबदारी दिली. मी जिल्ह्यात आलो तेव्हा सरपंचाचे काम काय, तहसिलदार काय करतात, प्रांताधिकार्‍यांचा अधिकार काय हे माहीत नव्हते, मात्र राजन तेलींकडुन तलाठयाचे काम काय हे पुस्तक मागून घेतले आणि मी अभ्यास केला आणि त्यांनतर आमदार झाल्यानंतर विधानसभेच्या लायब्ररीत मी अभ्यास केला. त्यामुळे सभागृहात बोलताना मी कधीही कमी पडलो नाही. तसेच काम येथिल पदाधिकार्‍यांनी केले पाहीजे. त्यासाठी आपण त्यांना शुभेच्छा देतो.
राणे पुढे म्हणाले, केंद्रीय मंत्रीपद स्विकारल्यानंतर दुसर्‍या दिवशी मी अधिकार्‍यांची बैठक बोलावून त्या ठीकाणी माझी कार्यपध्दती त्यांना सांगितली आणि कोकणची, महाराष्ट्राची दिल्लीत आज वेगळी ओळख करुन दिली आहे. भविष्यात कोकणच्या राजकारणात बॅ. नाथ पै, मधू दंडवते यांच्या यादीत नाव घेतले जावे असे मला काम करायचे आहे असे ते म्हणाले.

\