निधी खर्च केला नाही असे सांगून दिपक केसरकर खोटं बोलतात…

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सुधीर आडीवरेकरांची राणेंकडे नाराजीः शहरात डास निमुर्लन आणि स्वच्छतेसाठी भरीव निधी देण्याची मागणी….

सावंतवाडी ता.२८: आमदार दिपक केसरकर सावंतवाडी पालिकेला दिलेला निधी खर्च केला नाही असे सांगत आहेत. त्यांनी निधी दिला त्यावेळी त्यांच्याच पक्षाची सत्ता होती असे असताना सुध्दा ते खोटे बोलत आहेत. अशी नाराजी पालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी आज केद्रीय मंत्र्यांकडे केली.
सावंतवाडी शहरातील डास निमुर्लन आणि स्वच्छतेसाठी भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा तसेच शहरातून बांदा-संकेश्वर मार्ग जाण्यासाठी प्रयत्न करावा जेणे करुन शहरातील विकासाला त्याचा फायदा होणार आहे अशी ही मागणी त्यांनी केली.
श्री. आडीवरेकर यांनी आज या ठीकाणी राणेंसमोर आपली भूमिका मांडली. या ठीकाणी सत्ताधार्‍यांच्या माध्यमातून चांगले काम केले जात आहे. परंतू श्री. केसरकर हे निधी दिला नाही असे सांगुन नागरिकांची फसवणूक करीत आहेत असे आडीवरेकर म्हणाले.

\