“गोकुळ पॅटर्न”चा फायदा घेऊन सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे..

1
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभव नाईक; निधीच्या तरतुदीबाबत पालकमंत्र्यांचा हिरवा कंदील…

सिंधुदुर्गनगरी,ता.१२: जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यानी “गोकुळ पॅटर्न”चा फायदा घेऊन येथील दूध उत्पादनात वाढ करावी. त्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण घ्यावे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायातील प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा नियोजन मधून २५ लाख निधीची तरतूद करण्याबाबत पालकमंत्र्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे प्रशिक्षणाचा लाभ घेऊन येथील तरुणानी दुग्ध व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी आज दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.
सिधुदुर्ग जिल्हा बँक, गोकुळ दुध संघ, भगिरथ प्रतिष्ठान, समृध्दी डेअरी फार्म माडखोल या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आज माध्यमिक पतसंस्था ओरोस येथे दूध उत्पादन संस्था व शेतकरी यांच्यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .
आजच्या या मेळाव्याचे उद्घाटन कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, गोकुळ दूध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे, किसन चौगुले, बी आर पाटील, शशिकांत जुवेकर, श्रीकांत पाटील, सिंधुदुर्ग जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम के गावडे, भगीरथ प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉक्टर प्रसाद देवधर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डाटस, निता राणे जिल्हा बँकेचे सर व्यवस्थापक अनिवृद्ध देसाई, आदी मान्यवर उपस्थित होते

\