बसचे चाक पायावरून गेल्याने शाळकरी मुलगा गंभीर…

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण-चौके-गोड्याचीवाडी येथील घटना ; बसचालक पोलिसांच्या ताब्यात…

मालवण, ता. ०७ : मालवणहून पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या बसने चौके गोड्याचीवाडी येथील बसस्टाँपनजीक शाळेतून घरी परतताना रस्ता ओलंडणाऱ्या १२ वर्षीय शालेय मुलाला समोरुन ठोकर दिली. यात बसची चाके विद्यार्थ्यांच्या पायावरुन गेल्याने दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली आहे. हा अपघात सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान घडला.
मालवण येथे पर्यटन करुन चौके मार्गे गोव्याच्या दिशेने सुसाट जाणाऱ्या पर्यटकांच्या बसचा चालक हरी मात्रु करंगुटकर रा. म्हापसा शिवोली यांच्या ताब्यातील जीए-०३ डब्ल्यू-९८१० ने चौके गोड्याची वाडी येथे शिवाजी विद्यामंदिर काळसे या शाळेतून आपल्या घरी निघालेल्या इयत्ता सहावीत शिक्षण घेणाऱ्या कु. निनाद नारायण मांडलकर या (वय-१२) वर्षीय विद्यार्थ्यांला जोरदार धडक दिली. यात निनादच्या दोन्ही पायावरुन प्रवासी भरलेली बस गेल्याने गंभीर दुखापत झाली. स्थानिक ग्रामस्थ प्रभाकर परब, गौरव मांडलकर, विश्राम कदम तसेच चौके येथील बंड्या गावडे, गोट्या गावडे यांनी तत्काळ धाव घेत या शालेय विद्यार्थ्यांला अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविले. यावेळी घटनास्थळी उपस्थितांनी बसच्या चालकाला मारहाण करत पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीस कर्मचारी संतोष पुटवाड, योगेश सराफदार यांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.
गोव्याहून मोठ्या प्रमाणावर सिंधुदुर्गात पर्यटनासाठी पर्यटक घेऊन येणारे वाहनचालक सुसाट असतात. या वाहनचालकांकडून अनेक अपघात होत आहेत. त्यामुळे यांना वेळीच आवर घालावा अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली.

\