शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी विद्यार्थी केंद्रित विचार, कृती हवी…

4
2
Google search engine
Google search engine
Google search engine

डॉ. सुभाष देव ; सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यशाळा पार…

मालवण, ता. ११ : शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्व योजना पार पाडल्या पाहिजेत. बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे, असे प्रतिपादन गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी येथे केले.

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात Quality Enhancement या विषयावर काल कार्यशाळा पार पडली. कला, वाणिज्य, विज्ञान पदवी शिक्षण अधिक गुणवत्ता पूर्ण कसे करता येईल, या उद्देशाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या (IQAC) वतीने या कार्यशाळेचे नियोजन केले होते. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांनी या कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. उज्वला सामंत यांनी डॉ. देव यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Bअध्यापन, अध्ययन प्रक्रिया, प्रशासकीय कामकाज आणि संस्था व्यवस्थापन गुणवत्ता वाढीसाठी काय काय प्रयत्न करता येतील, याबाबत डॉ. देव यांनी उपस्थितांशी तीन सत्रांमध्ये संवाद साधला. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंत वालावलकर आणि सचिव चंद्रशेखर कुशे तसेच कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षेकतर कर्मचारी आणि या कार्यशाळेस उपस्थित होते.

अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या सदस्य डॉ. सुमेधा नाईक यांनी कार्यशाळेचे संचालन केले तसेच सर्वांचे आभार मानले.

\