गाबितांनी मासेमारीबरोबरच रंगमंचही दणाणून सोडला…

0
2
Google search engine
Google search engine
Google search engine

जी. जी. चोडणेकर ; बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त दशावतार कलाकारांचा सत्कार…

मालवण, ता. २२ : माझा हा दशावतार प्रवास इथवर येऊन पोचण्याच कारण एकच की एका कलाकाराने निरोप देताना सांगितले गाबतांचे हे काम नव्हे गाबतांनी बांगडे मारावे आणि वाटे घालावे. मात्र गाबीत फक्त वाटे घालत नाही तर रंगमंच देखील दणाणून सोडतात हे दाखवून दिले असे प्रतिपादन ज्येष्ठ दशावतारी कलाकार जी. जी. चोडणेकर यांनी देवबाग येथे केले.

मालवण शिवसेनाच्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दशावतार कलाकारांचा सत्कार समारंभ देवबाग येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी देवबाग पंचक्रोशीतील २५ दशावतार कलाकारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्री. चोडणेकर म्हणाले, ३५ वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य केले. अनेक चढ उतार, अनेक अडचणींवर मात केली. अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांच्या हस्ते झी गौरव ने पुरस्कार मिळाला. अर्थात हा सत्कार माझा नसून या देवबाग गावचा आहे.

यावेळी देवबाग पंचक्रोशीतील आनंद मेस्त्री, बाबा उपरकर, बाबू मांजरेकर, यशवंत मांजरेकर, विनोद देऊलकर, निलेश देऊलकर, मंगेश खोबरेकर, रुपेश लोंढे, सायबा केळुसकर, गिरिधर गावकर, रवी भांजी, विजय मालंडकर, भाऊ गोवेकर, गजानन मांजरेकर, जिजी राऊळ, महेश तांडेल, दिनेश राऊळ, नंदकिशोर कांदळगावकर, विजय चोपडेकर, तुषार चोपडेकर, विलास तांडेल, मुकेश कांदळगावकर, बाबी राऊळ, सिद्धेश देऊलकर, उमेश परुळेकर या दशावतार कलाकारांना गौरविण्यात आले.

कार्यक्रमास शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, शिवसेना जिल्हा समन्वयक भगवान लुडबे, शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, ज्येष्ठ दशावतारी कलाकार जी. जी. चोडणेकर, आबा कुर्ले, विलास वालावलकर, सिताकांत तांडेल, प्रसाद चव्हाण, उपविभाग प्रमुख अनिल केळुसकर आदी उपस्थित होते.

श्री. गोवेकर म्हणाले, देवबागचे कलाकार हे अनोखे आहेत. पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नव्हती. आता तर आपण घरात बसून देखील दशावतार पाहू शकतो. त्यामुळे हा दशावतारी कलाकारांना मोठे सहकार्य नव्हते. परंतु आता दशावतारी कलेला जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो व प्रशासनाकडून देखील पाठिंबा मिळत आहे. ही कला जपली पाहिजे. देवबाग हा मच्छीमारी भाग असून देखील सोबत अनेक नाटके वगैरे देखील होत होते. त्यामुळे अनेक कलाकार नावारूपाला आले अशी कला जपली पाहिजे. हरी खोबरेकर यांच्यासारखे एक चांगले कार्यकर्ते मिळालेले आहेत. जिल्ह्यातील कलाकार देवबागमध्ये येऊदेत त्यांचा देखील कार्यक्रम ठेवला जाईल. गजानन मांजरेकर यांनी प्रास्ताविक करत आभार मानले.

\