सिंधुदुर्गात कृषी प्रदर्शन भरवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना द्या…  

2
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सतीश सावंत; पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी…

कणकवली,ता.०२: सिंधुदुर्गात गेल्या तीन वर्षात कृषी प्रदर्शन भरविण्यात आले नाही. मात्र जिल्ह्यात हे प्रदर्शन व्हावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. त्यामुळे यासंदर्भात योग्य ते नियोजन करून कृषी प्रदर्शन भरण्यासंदर्भात संबंधित विभागाला सूचना द्याव्यात, अशी मागणी माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रसिद्धीस दिले.

त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्ह्यात कृषी प्रदर्शन सन २०१७-१८ मध्ये झाले होते. त्यानंतर सन २०१९-१९,सन २०१९-२० व सन २०२०-२१ या 3 आर्थिक वर्षात कृषी प्रदर्शन झालेले नाही. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शन होनेसाठी मनोमन इच्छा आहे. तशी मागणी आमच्याजवळ केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिने कृषी प्रदर्शन होणे आवश्यक आहे. तरी या संदर्भात योग्य ते नियोजन करणेसाठी आपल्या स्तरावरून सबंधित जिल्हा परिषद प्रशासन, राज्य कृषी अधीक्षक, जिल्हा नियोजन अधिकारी यांना निर्देश देणेत यावेत, असे म्हटले आहे

\