माडखोल-धवडकी येथून ४० वर्षीय तरुण बेपत्ता…

7
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी पोलिसात नोंद; पत्नीची पोलीस ठाण्यात खबर…

सावंतवाडी ता. ०९: माडखोल-धवडकी येथून ४० वर्षीय तरुण बेपत्ता झाला आहे. संतोष दिनकर मुरकर, असे त्यांचे नाव आहे. ते १४ डिसेंबरला मुंबईला जातो, असे सांगून घरातून बाहेर पडले. मात्र त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे नातेवाईकांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान ते कोठेही आढळून न आल्याने त्यांची पत्नी पल्लवी मुरकर यांनी आज येथील पोलीस ठाण्यात धाव घेत बेपत्ताची खबर दिली आहे. त्यानुसार पोलिसात नापत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बेपत्ता मुरकर हे १४ डिसेंबरला आपण मुंबईत जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. मात्र ते कोठेही आढळून न आल्याने त्यांच्या पत्नीने बेपत्ताची खबर सावंतवाडी पोलिसात दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात नापत्ताची नोंद करण्यात आली असून शोध कार्य सुरू करण्यात आले आहे.

\