खारेपाटण येथे आजोळी आलेल्या एक वर्षीय बालकाचा आकस्मिक मृत्यू…

6
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०९: तिरवडे तर्फ खारेपाटण येथे आजोळी आलेल्या एक वर्षाच्या बालकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. आदर्श विजय हातणकर मूळ रा. तळवडे ता. राजापूर असे या मृत बालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी दुपारी १२ वा. सुमारास घडली. याबाबत वडील विजय काशिराम हातणकर यांनी वैभववाडी पोलिस ठाणेत खबर दिली आहे.

आई सोबत हे बाळ आपल्या आजोळी तिरवडे तर्फ खारेपाटण येथे आले होते. सोमवारी त्याची तब्बेत बिघडल्यामुळे त्याला उंबर्डे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. माञ उपचारापूर्वीच बालकाचा मृत्यू झाल्याचे डाॕक्टरांनी सांगितले. मयत बालक हे आईच्या पोटात असताना सातव्या महीण्यात करण्यात आलेल्या सोनोग्राफीमध्ये हृदय कमजोर असल्याचे डाॕक्टरांनी सांगितले होते. मृत बालकाचे शव शवविच्छेदन कणकवली उपजिल्हा रुग्णायात करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.शवविच्छेदन अहवालानंतर नेमका मृत्यू कशाने झाला हे स्पष्ट होणार आहे.

\