कोळंब येथे कार रस्त्या लगत असलेल्या घरावर धडकली…

8
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भिंत कोसळून नुकसान; सुदैवाने कोणीही जखमी नाही…

मालवण, ता. १८ : मालवण आचरा मार्गावरील कोळंब येथे आज पहाटे एक मोटार रस्त्यालगत असलेल्या घरावर धडकली. यात घराच्या भिंती कोसळल्या. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

कोळंब मधलीवाडी येथे राहणारे दिनकर बाळकृष्ण डिचोलकर पत्नी व मुलगा हे कुटुंब झोपेत असताना मालवणच्या दिशेने येणारी मोटार पहाटे ३ वाजता घरावर धडकली. मोठा आवाज झाला. यात घराच्या दर्शनी भागाच्या भिंती कोसळल्या. डीचोलकर कुटुंब व शेजारी घराबाहेर आले. अपघातग्रस्त मोटारीतून चालक बाहेर आला. भोगवे येथून रेवंडी येथे जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले.

 

\