सावंतवाडीतील परप्रांतीय कामगाराचे उपचारादरम्यान निधन…

7
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२१: येथील जिमखाना परिसरात राहणाऱ्या परप्रांतीय युवकाचे उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेले काही दिवस तो आजारी होता. राजू जैस्वाल असे त्याचे नाव आहे. तो मुळचा नेमका कुठचा,कोठून आला होता याबाबत अधिक कोणाला माहिती नाही. त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णाला दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याची प्राणज्योत मालवली. याबाबत अधिक माहित अशी की, राजू जैस्वाल हा सावंतवाडी शहरात जिमखाना परिसरात राहत होता. काल सकाळी तो अस्तव्यस्त स्थितीत जिमखाना मैदान शेजारी पडलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे त्याला १०८ रूग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे दाखल करण्यात आले तसेच अधिक उपचारासाठी जिल्हा रूग्णालय ओरोस येथे हलवले असता आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

\