पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खानोली ग्रामस्थांचा हात…

146
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.२१: पूरग्रस्तांना वेंगुर्ले तालुक्यातील खानोली गावामधून जी १८६०० रुपयांची मदत गोळा झाली त्या रकमेचा मुख्यमंत्री सहाय्यता निधी साठी धनादेश आज गावाच्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार श्री. शिंदे यांच्याकडे देण्यात आला.
हा धनादेश देताना खानोली सरपंच सौ प्रणाली खानोलकर, उपसरपंच श्री सुभाष खानोलकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे गाव अध्यक्ष श्री संजू प्रभू, स्वाभिमान पक्षाचे वेंगुर्ला सरचिटणीस श्री महेश प्रभू, ग्रामपंचायत सदस्य भाऊ केरकर आदी उपस्थित होते.