जे तुमच्या मनात, तेच आमच्या मनात,…

2

आशिष शेलार;शिक्षक,संघटना,संस्था चालकांना समस्या सोडविण्याचे आश्वासन….

सिंधुदुर्गनगरी ता.२१:
पटसंख्येनुसार शिक्षक देण्यासाठी लावण्यात आलेल्या निकषाचा पुनर्विचार करण्यात यावा असे आदेश मी पूर्वीच दिले आहेत. प्राथमिक शाळांचे बंद झालेले सादिल अनुदान देण्यासाठी 400 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा संकुलाला निवास व्यवस्था करण्यासाठी सर्वप्रथम अनुदान मिळवून देण्याची मी हमी देतो. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण विभागात शिक्षकांना त्रास देण्याचा निनावी फोन आला तरी मी कारवाई करेन असे सांगतानाच शालेय शिक्षण, क्रीडा व युवा मंत्री आशीष शेलार यांनी ‘जे तुमच्या मनात, तेच आमच्या मनात आहे’. ‘जे तुम्हाला हवय, तेच सरकारला करायचे आहे’, असे आश्वासन शिक्षक, शिक्षक संघटना व शिक्षण संस्था प्रतिनिधी यांच्यासाठी आयोजित ‘शिक्षक संवाद सभा’ कार्यक्रमात बोलताना दिले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे, भाजपचे अतुल काळसेकर, संदेश पारकर, माजी आमदार अजित गोगटे, अतुल रावराणे, जयदेव कदम, राजू राऊळ, राजेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक संघटना, क्रीडा शिक्षक संघटना, कला शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक भारती, संस्था संघटना यांनी प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षणाच्या समस्या मांडल्या. यावेळी बहुतांश संघटना व व्यक्तींनी आपल्या मागण्या निवेदनाद्वारे शिक्षणमंत्री शेलार यांच्यासमोर मांडल्या. यावेळी रिक्तपदे तात्काळ भरा. वेतनोत्तर अनुदान मिळावे. कला शिक्षक व क्रीडा शिक्षक यांचा पवित्र पोर्टलमध्ये समावेश करावा. 20 पटसंख्येला एक शिक्षक ही अट रद्द करावी. जिल्हा क्रीडा अधिकारी व क्रीडा विभागातील रिक्त दहा पदे तात्काळ भरावीत. क्रीडा विभागाच्या 42 योजना राबवाव्यात. जिल्हा क्रीडा संकुलला निवास व्यवस्था द्यावी. जिल्ह्यात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा भरवाव्यात. अनुदानित शाळांप्रमाणे विनाअनुदानित शाळांतील मुलांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात. अंशदायी पेंशन योजना रद्द करून जुनी पेंशन योजना राबवावी. प्राथमिक शिक्षकांवर लादण्यात आलेली 133 अशैक्षणिक कामे रद्द करावी. रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भाग म्हणून शिक्षण हक्क कायद्यात बदल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

4

4