शिवसेनेने मंत्रीपदासाठी कोट्यावधी मागितले, १ कोटी चेकने दिले…

669
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दीपक केसरकरांचा आरोप; गद्दार म्हणायचा तुम्हाला अधिकार काय…?

सावंतवाडी,ता.०६: मंत्रीपद देण्यासाठी शिवसेनेकडून कोट्यावधी रुपये माझ्याकडे मागण्यात आले होते. परंतु मी “कमिटमेंट” पूर्ण करण्यासाठी कमी पडलो. त्यामुळे मला डावलण्यात आली तरीही तब्बल १ कोटी रुपये मी त्यांना चेकच्या माध्यमातून दिले तशा प्रकारचे माझ्याकडे पुरावे आहेत, असा आरोप आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. दरम्यान तब्बल दोन महिने मी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर वाट बघत होतो. परंतु मला भेट देण्यात आली नाही. कॅबिनेट मंत्री पदासाठी माझे नाव चर्चेत असताना मला राज्यमंत्रीपद देण्यात आले. तरी मी गप्प राहिलो. मग मी गद्दार कसा..? मला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला..? असा सवाल श्री.केसरकर यांनी उपस्थित केला.

या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे २ दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते .त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती. त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे. मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही. त्याचे कर्तृत्व काय? मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते. मी तब्बल २ महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो. पण मला कधी भेट मिळत नव्हती. मग यांच्याकडे लोक थांबणार कसे? असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो. मला भाजपकडून निमंत्रण असतना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो, असे मंत्री केसरकर यांनी सांगितले.

\