वेंगुर्ला बंदरात बुडालेल्या एकाचा मृतदेह सापडला…

1098
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तिघे अद्यापही बेपत्ता; कोस्टगार्ड व हेलिकॉप्टर द्वारे शोध सुरू…

वेंगुर्ले,ता.२४: येथील बंदरात बुडालेल्या ४ खलाशांपैकी १ खलाशाचा मृतदेह मोचेमाड समुद्रात सापडला आहे. महादेव शंकर आंबेडकर (वय ६६, रा. रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. तर आजान मुनीलाल कोल (वय १६), चांद गुलाम मोहम्मद व शिवराम कोल सर्व रा.मध्य प्रदेश) हे अद्याप पर्यंत बेपत्ता आहेत. त्यांचा कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टर व बोटीद्वारे शोध सुरू आहे.

दरम्यान बुडालेली नौका देखील मूठ समुद्रात सापडली आहे. दरम्यान बंदरावर तहसीलदार ओंकार ओतारी, फिशीरीचे अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित आहेत.

\