देवगड निपाणी महामार्गावर कार व आराम बस यांच्यात अपघात…

696
2
Google search engine
Google search engine
Google search engine

असलदे-डामरेवाडी येथील घटना; कारमधील दोघे जखमी…

कणकवली,ता.२४: देवगड निपाणी महामार्गावर कणकवली तालुक्यातील असलदे-डामरेवाडी वळणावर कार आणि आराम बस यांच्यात अपघात झाला. सायंकाळी सव्वापाच वाजता ही घटना घडली. यात कारमधील दोघे जखमी झाले. त्‍यांच्यावर कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात उपचार सुरू आहेत. देवगडहून मुंबईच्या दिशेने आराम बस जात होती. तर कार सांगली ते देवगड अशी जात होती. असलदे डामरेवाडी येथील वळणावर कार आणि बस यांच्यात धडक झाली. यात कारमधील रूक्‍साना वसीम भोकरे (वय २७) आणि त्‍यांची छोटी मुलगी आलीया ही जखमी झाली. अपघाताच्या घटनेनंतर रूग्‍णवाहिकेतून दोन्ही जखमींना कणकवली उपजिल्‍हा रूग्‍णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्‍यांच्यावर उपचार सुरू आहेत. आराम बस हे संजय अरूण सावंत चालवत हाेते. तर वसीम भोकरे हे कार घेऊन देवगडच्या दिशेने जात होते.

\