कुडाळ शरद पवार राष्ट्रवादी शहराध्यक्षपदी संतोष पाटकर…

231
2
Google search engine
Google search engine

अमित सामंताच्या हस्ते नियुक्तीपत्र; मावळत्या अध्यक्षांना तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी…

कुडाळ,ता.२८: येथील तालुका शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर अध्यक्ष संतोष पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या संग्राम सावंत यांना तालुका उपाध्यक्ष म्हणून संधी देण्यात आली आहे. याबाबत आज त्यांना जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच संघटना वाढीसाठी योग्य ते काम करा, अशा सुचना देण्यात आल्या.

यावेळी प्रसाद रेगे, जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर, जिल्हा सरचिटणीस भास्कर परब, तालुका अध्यक्ष शिवाजीराव घोगळे, अल्पसंख्याक कार्याध्यक्ष नझीर शेख, तालुका उपाध्यक्ष साबा पाटकर, अशोक कांदे, नरेश उर्फ लालू पटेल, निलेश उमळकर ओबीसी तालुका अध्यक्ष जयराम डिगसकर, अख्तर गोलंदाज आदी उपस्थित होते.