भाजप वेंगुर्ले तालुक्याची विस्तारीत कार्यकारणी जाहीर

2

 

पक्ष वाढीसाठी एकदिलाने काम करण्याचा निर्णय

वेंगुर्ले
भाजप वेंगुर्ले तालुका विस्तारीत कार्यकारणी तालुका कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा चिटणीस प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आणि तालुका अध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान तालुक्यात पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकदिलाने काम करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
भाजपच्या वेंगुर्ले तालुका कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष विनायक उर्फ सुहास गवंडळकर, सरचिटणीस प्रशांत प्रभूखानोलकर, सरचिटणीस बाबली रामा वायंगणकर, उपाध्यक्ष प्रीतेश शंकर राऊळ, मनवेल गिरगोल फर्नांडिस, गोविंद भिवा नाईक, संतोष दशरथ गावडे, निलेश दत्तात्रय सामंत, लक्ष्मीकांत गंगाराम कर्पे, चिटणीस संजय नारायण मोंडकर, सुजाता संदीप देसाई, जनार्दन कुडाळकर, नितीन धोंडू चव्हाण, विजय दामोदर ठाकूर, कोषाध्यक्ष किर्तीमंगल दीपक भगत, महिला तालुकाध्यक्ष स्मिता मिलिंद दामले, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद कृष्णा पाटकर, महिला शहर अध्यक्ष प्रार्थना पुंडलिक हळदणकर, मच्छीमार आघाडी अध्यक्ष अनंत वासुदेव केळुस्कर, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष सायमन किस्तू आलमेडा, ओबीसी आघाडी अध्यक्ष रमेश पुंडलिक नार्वेकर, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष गुरुप्रसाद भगवान चव्हाण, किसान मोर्चा अध्यक्ष यशवंत बाळकृष्ण पंडित, सहकार आघाडी अध्यक्ष विजय वासुदेव नाईक, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष विक्रांत सुहास चुडजी, सोशल मीडिया अध्यक्ष विष्णू चंद्रकांत परब, क्रीडा सेल अध्यक्ष तुकाराम उर्फ तुषार नारायण साळगावकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण इत्यादींची निवड करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांच्यासह जिल्हा चिटनीस निलेश सामंत, साईप्रसाद नाईक, तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, प्रसाद पाटकर, बाळु प्रभु, मनवेल फर्नांडिस, बाळा सावंत, बापू पंडित, संतोष गावडे, जेष्ठ नेते राजु राऊळ, दादा केळुसकर आदी उपस्थित होते.

1

4