सातवी नापास असलेल्या साळगावकरांवर काय बोलणार…?

726
2
Google search engine
Google search engine
Google search engine

संजू परबांचे प्रत्युत्तर; साळगावकरांचे डिपॉझिट दोनदा जप्त करून मतदारांनीच जागा दाखवली…

सावंतवाडी,ता.२०: बबन साळगावकर यांचा विधानसभा आणि नगराध्यक्ष निवडणुकीत असे दोनदा पराभव झाला, डिपॉझिट जप्त झाले आहे. अश्या व्यक्तीच्या टीकेला मी उत्तर देणार नाही, असे प्रत्युत्तर सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी दिले.
दरम्यान जो माणूस सातवी नापास आहे, अशा माणसाच्या टीकेला आपण काय उत्तर द्यायचे?, असा ही उलट प्रश्न त्यांनी केला. सकाळी या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करून माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी संजू परब यांच्यावर टीका केली होती. याला परब यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रत्युत्तरादाखल आपण साळगावकर यांच्या टीकेला उत्तर देणार नाही. त्यांच्यावर बोलला नाही त्यांचे तब्बल दोन वेळा डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यामुळे त्यांची पात्रता त्यांना मतदारांनी दाखवून दिलेली आहे. त्यामुळे अश्या सातवी नापास झालेल्या व्यक्तीवर मी काय बोलणार?, असा उलट प्रश्न त्यांनी केला.

\