बांदा-गडगेवाडी येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी केले रास्तारोको आंदोलन..

630
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा-दोडामार्ग रस्त्याचा प्रश्न; शिवसेना तालुकाप्रमुखांच्या टिकेवर पदाधिकारी आक्रमक…

बांदा ता.०४: बांदा-दोडामार्ग रस्त्याच्या कामाबाबत शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी भाजप पदाधिकाऱ्यांवर टीका केल्याने बांदा व दोडामार्ग मधील भाजप पदाधिकारी आक्रमक होत त्यांनी बांदा-गडगेवाडी येथे अचानक रास्तारोको आंदोलन केले. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत नाहीत तोपर्यंत येथून न हटण्याचा निर्णय भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतला.
यावेळी सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, उपसभापती शीतल राऊळ, दोडामार्गचे माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नाथा नाडकर्णी यांच्यासह भाजपचे बांदा ते दोडामार्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

\