इन्सुली येथे डंपर व आलिशान मोटारी मध्ये अपघात…

1148
2
Google search engine
Google search engine
Google search engine

दोन्ही गाड्यांचे नुकसान ; सुदैवाने जीवित हानी नाही…

बांदा,ता.०९:
गोव्याहुन सावंतवाडीच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या आलिशान ऑडी मोटारीने डंपरला मागाहुन जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात सायंकाळी ४ वाजता इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर झाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने आलिशान ऑडी मोटार भरधाव वेगात जात होती. इन्सुली पोलीस तपासणी नाका येथे चालकाला अंदाज न आल्याने मोटारीची डंपरला मागाहुन जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. पोलीस हवालदार प्रमोद मोरजकर, श्री पवार यांनी पंचनामा केला. बांदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

\