“त्या” मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..

248
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी महिला शहर भाजपची मागणी;पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर…

सावंतवाडी ता.१७: युवतीच्या आत्महत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या राज्याच्या वनमंत्र्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी सावंतवाडी महिला भाजपच्या वतीने आज येथील पोलिसांकडे करण्यात आली.यावेळी शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्याकडे याबाबतचे निवेदन दिले.
याप्रसंगी नगरसेविका दीपाली भालेकर, निर्मला यादव,मिसबा शेख,मेघना साळगावकर,सुप्रिया केसरकर,समृद्धी विरनोडकर,ज्योती पाटणकर ,आदिती दळवी आदी महिला उपस्थित होत्या.

\