सिंधुदुर्गात विनामास्क फिरणाऱ्या ३५६ जणांवर दंडात्मक कारवाई…

123
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्गनगरी,ता.२५: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात ३५६ व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यामध्ये महसूल विभागाने काल एका दिवसात ३१ व्यक्तींवर कारवाई करत एकूण ७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे, तर पोलिसांनी २६८ व्यक्तींवर कारवाई करत एकूण ५३ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. नगर पालिका क्षेत्रामध्ये ५५ व्यक्ती या विनामास्क आढळून आल्याअसून त्यांच्याकडून एकूण ११ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर जिल्ह्याच्या ग्रामिण भागामध्ये २ व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून ४०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. काल दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम ही ७२ हजार ४०० रुपये इतकी आहे.

त्याशिवाय जिल्ह्यातील महसूल, पोलीस आणि नगर पालिका प्रशासनाकडून एकूण १३६ ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ४ ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे, तसेच मास्क, हॅन्डसॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

\